सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ज्यात अंपायर मंत्रमुग्ध होऊन डान्स केला.
क्रिकेटच्या मैदानात आपल्या अफलातून स्टाईलमुळे प्रसिद्ध असलेले पंच बिली बाउडन आपल्याला काही नवे नाहीत. मैदानात त्यांना हटके शैलीत एखादा निर्णय देताना पाहिलं की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरही हसू उमटतं. त्यांच्या स्टाईलनं प्रेक्षकांचं मनोरंजन होते. म्हणूनच बिली सगळ्यांचे आवडते पंच आहेत असं म्हटलं तर चूक ठरणार नाही. पण सध्या बिली बाउडनसारख्या एका पंचाचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय.

या स्पर्धेत सामना सुरु असताना चंद्रा हे गाणं वाजवलं जाते. त्यावेळी अंपायर मैदानात चक्क चंद्रा गाण्यावर डान्स करत आहे. त्याच्या या हटके शैलीमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. इतकंच नाही तर या भन्नाट पंचाचा मैदानातला डान्स पाहून नेटकरीही फिदा झाले आहेत. म्हणूनच अशा दुर्मीळ पण मजेशीर क्षणाचा हा व्हिडिओ नक्की पाहा.