‘द केरळ स्टोरी’ सिनेमा सध्या भारतातच नव्हे तर जगभरात चर्चेत आहे. आता हा सिनेमा केवळ भारतात नाही तर अन्य देशांमध्ये सुद्धा प्रदर्शित होणार आहे.
सुदीप्तो सेन आणि अदा शर्मा अभिनीत चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या कमाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आसपास प्रचंड विरोध होऊनही ‘द केरळ स्टोरी’ स्टोरीने बंपर कमाई केली.

5 मे ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला रिलिज होऊन आता ९ दिवस झाले आहेत. या सहा दिवसात ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. द केरळ स्टोरीची अवघ्या ९ दिवसात १०० कोटी क्लबमध्ये दिमाखात एंट्री झाली.
निश्चितच या चित्रपटाच्या यशाचं श्रेय त्याच्या कथेला आणि त्याभोवती निर्माण झालेल्या वादाला जाते आहे. केरळ स्टोरीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात माऊथ पब्लिसिटी मिळत आहे.
‘द केरळ स्टोरी’ ने पहिल्या बुधवारी म्हणजेच रिलीजच्या 6 दिवशी देखील बंपर कमाई केली होती. या चित्रपटाने बुधवारी चांगलीच एकाच दिवसात 12 कोटींची कमाई केली.