स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.
नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार परिधान करताना दिसत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा….

छत्रपती संभाजी महाराज ज्यांना समजले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले. त्यांना समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर काळजात निष्ठा असावी लागते.
“शौर्यपीठ” कथा सांगते राजाची. नुसते त्या भूमीत उभे राहिले तर डोळे पाणावतात. ही भावना त्यांनाच समजू शकते जे एकदा तरी तिथे गेले आहेत” छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ही पोस्ट शेअर केली आहे.