Latest Marathi News

BREAKING NEWS

गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणे पडले चांगलेच महागात…

0 1,324

सध्या प्रत्येक गावागावात गौतमीचा कार्यक्रम होताना दिसुन येत आहे. गौतमी आपल्या गावात येणार म्हटल्यावर कार्यक्रमाची जय्यद तयारी सुरू होते. अगदी लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सर्वांच्या अंगात उत्साह संचारतो.

परंतु सोलापूरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं एका आयोजकांना चांगलच महागात पडल्याचं दिसुन येत आहे.

Manganga

कोणतीही शासकीय कार्यालयाची परवानगी घेतली नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच लेखी कळवूनही लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिचा सांस्कृतिक लावणी कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आयोजकावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राजेंद्र भगवान गायकवाड (महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष, प्रजाशक्ती पार्टी, रा. आगळगाव रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आयोजकाचे नाव आहे. पोलिस अमोल वाडकर यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री दहाच्या दरम्यान घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!