पुणे: पत्नी आणि तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या त्रासामुळे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल केला.
संतोषकुमार बाबासाहेब कोरे असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी रवीना संतोषकुमार कोरे (रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे) हिच्यासह रंजना दामोदर इरळे, दामोदर इरळे, संग्राम दामोदर इरळे, गणेश दिवेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत संतोषकुमारची आई यशोदा बाबासाहेब कोरे (वय ५५, रा. कोळी ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. संतोषकुमार यांना मालमत्तेसाठी पत्नी रवीना, सासू रंजना, सासरे दामोदर त्रास देत होते. त्यांच्या त्रासामुळे मुलगा संतोषकुमारने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे यशोदा कोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.