Latest Marathi News

BREAKING NEWS

नशिबाचा खेळ! नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या आदल्या दिवशी उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; तर……

0 640

 

कोणाच्या आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही, नशिबालाचा खेळ खूप निराळा असतो असं म्हटलं जाते. उत्तर प्रदेशातील नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान एका अपक्ष उमेदवाराला केवळ ३ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. पण विजयचा जल्लोश साजरा करण्यासाठी तो उमेदवारच तिथे उपस्थित नव्हता. कारण या उमेदवाराचा निकालाच्या एक दिवस आधी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

 

Manganga

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सुलतानपूर जिल्ह्यातील कादीपूर नगर पालिकेशी संबंधित आहे. या ठिकाणच्या १० प्रभागासाठी निवडणूक झाली होती. निराला नगर प्रभाग क्रमांक १० मधून अपक्ष उमेदवार संत प्रसाद यांनी निवडणूक लढवली.

 

संतराम यांना २१७, तर रमेश यांना २१४ मते मिळाली. आंब्याच्या बागेची राखण करत असताना शुक्रवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संत प्रसाद यांच्या निधनाचे वृत्त समजताच मतमोजणी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या लोकांनी हळहळ व्यक्त केली.

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!