Latest Marathi News

BREAKING NEWS

बसला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; तर एकजण जखमी

0 128

 

त्र्यंबक नाका परिसरात भरधाव दुचाकी बसवर धडकून झालेल्या अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. शुभम कोकाटे (२१, राणाप्रताप चौक, सिडको) आणि शुभम सोनवणे (२१, मूळ भुसावळ, जळगाव) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे असून जयेश महाजन (२१, म्हसवळ, जळगाव) हा युवक अपघातात जखमी झाला आहे.

 

Manganga

मृत व त्यांचा जखमी मित्र मध्यरात्री दुचाकीवरुन प्रवास करीत होते. त्र्यंबक नाका परिसरात जेवणासाठी ते हॉटेल शोधत असताना हा अपघात झाला. जिल्हा रूग्णालयाकडून त्र्यंबक नाक्याकडे भरधाव जात असतांना त्र्यंबक नाक्याकडून येणाऱ्या बसने ठक्कर बाजार बस स्थानकाकडे वळण घेतल्याने दुचाकी बसवर धडकली.

हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकी थेट बसच्या पाठीमागील चाकात सापडल्याने तिचा चक्काचूर झाला.

 

यात शुभम कोकाटे आणि शुभम सोनवणे या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा तिसरा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!