सर्वसाधारणपणे जगात दोन प्रकारची माणसं असतात, एक शाकाहारी अन् दुसरी मांसाहारी. यापैकी मांसाहारी लोक वेगवेगळ्या प्रकारचे मांस, मटण अत्यंत आवडीने सेवन करतात, पण तुम्ही कधी कोणाला स्वतःचंच मांस खाताना पाहिलं किंवा त्याबद्दल ऐकलं आहे का?
एका स्पॅनिश महिलेने असा प्रकार केल्याचं नुकतंच उघडकीस आलं आहे. या स्त्रीने स्वतःच्या गुडघ्याचं मांस शिजवून खाल्लं, एवढंच नव्हे त्याच वेळी तिने तिचं ते मांस तिच्या प्रियकरालाही खायला दिल्याचं स्पष्ट केलं आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एका पॉडकास्टदरम्यान मुलाखतीत पॉलाने स्वतःच कबूल केलं आहे की, ती तिचं मांस शिजवते आणि खाते. इतकंच नव्हे तर आपल्या बॉयफ्रेंडसह एका रोमॅंटिक डेटवर गेली असताना तिने तिच्या गुडघ्याचं मांस शिजवून एक खास डिश बनवली आणि आपल्या बॉयफ्रेंडलाही खाऊ घातली.
तिच्या शरीरातील तो मांसल भाग एका शास्त्रक्रियेदरम्यान काढलेला होता. पॉलाच्या पायाला दुखापत झाली असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. यादरम्यान तिच्या गुडघ्यातील एक हाडाचा मऊ हिस्सा काढण्यात आला. डॉक्टरांनी तिला तो भाग तिला हवा आहे का, असं विचारल्यावर तिने होकार दिला. त्यानंतर तो भाग एका कंटेनरमध्ये ठेवण्यात आला.