लेकिनं मागितली टॅटूसाठी वडिलांकडे परवानगी! वडिलांचं भन्नाट उत्तर; WhatsApp चॅट सोशल मिडीयावर व्हायरल….
सध्या टॅटूचा तरुणांमध्ये ट्रेंड आहे. जवळपास ५० टक्के तरुण पिढी टॅटू काढत असल्याचं दिसून येत आहे. मोठ्या शहरात असणारी टॅटूची दुकाने आणि सेलिब्रिटी, इंटरनॅशनल स्तरावरचे खेळाडूच्या अंगा-खांद्यावर असणारे हे टॅटू आता गावागावातल्या तरुणी-तरुणीच्या अंगा-खांद्यावर दिसत आहे.
असं असलं तरी मात्र बऱ्याच जणांच्या घरुन टॅटूसाठी परवानगी नसते. मुलांना पालकांकडून टॅटूसाठी सक्त मनाई असते. अशावेळी मग सरकारी नोकरी नाही मिळणार, त्वचा खराब होते अशी कारणं पालक मुलांना सांगत असतात. मुलंही पालकांकडे हट्ट करुन परवानगी मागत असतात.

सध्या एका मुलीने तिच्या वडिलांकडे टॅटूसाठी परवानगी मागताना केलेल्या मॅसेजचा स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यामध्ये ती एका टॅटूचा फोटो तिच्या वडिलांना पाठवते, यावर तिचे वडिल जो रिप्लाय देतात तो बघून तुम्हालाही हसू अनावर होईल.
तिच्या वडिलांनी तिला थेट आय विल किल यू.. असा रिप्लाय दिला. यावरुन ती वडिलांकडे टॅटूसाठी परवानगी मागत असल्याचं दिसतंय, मात्र वडिलांनी तिला यावर स्ट्रिक्टली नाही असं सांगितलं आहे.
टॅटूला नाही म्हणण्याची वडिलांची पद्धत पाहून ती खरंच टॅटू काढायची हिम्मत करणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो शरन्या नावाच्या युजरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
My dad approves of the tattoo clearly pic.twitter.com/8uJrYWq5X1
— sharanya;) (@sharandirona) May 10, 2023