भारतीय रेल्वे नेहमी सर्व प्रवाशांना सल्ला देते की कधीही चालत्या ट्रेनमध्ये चढू नये. अन्यथा ते अपघाताला बळी पडू शकतात. मात्र तरीही प्रवाशी या नियमांकडे दुर्लक्ष करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. वारंवार आवाहन केलं जात असलं तरी काही महानग असे असतात जे यातून कोणताही धडा घेत नाहीत.
आणि आपला जीव धोक्यात घालतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढताना ट्रेनमधून पडणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ अनेकदा व्हायरल होतो. मात्र, प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे सुरक्षा कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात असतात. सध्या अशीच एक रेल्वे स्थानकावरील घटना समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चढताना त्याचा पाय अडखळतो आणि ट्रेनसोबत तो ओढला जातो. तेवढ्या एक महिला शिपाई तात्काळ तत्परनेनं त्या व्यक्तीला बाजूला ओढलं आणि त्याचा जीव वाचवला. हा व्हिडिओ झारखंडचा आहे.
झारखंडच्या टाटानगर रेल्वे स्थानकावर, धडाकेबाज आरपीएफ कॉन्स्टेबल एसके मीना यांनी एका प्रवाशाला प्लॅटफॉर्म आणि चालत्या ट्रेनमध्ये पडण्यापासून वाचवले. या धाडसी महिला आरपीएफ कॉन्स्टेबलचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Quick response by lady constable S.K. Meena saved a passenger's life who slipped towards the platform gap while attempting to board a moving train at Tatanagar Station.#MissionJeevanRaksha #SewaHiSankalp #WeServeAndProtect @ANI pic.twitter.com/aof7YP7E31
— RPF INDIA (@RPF_INDIA) May 10, 2023