Latest Marathi News

BREAKING NEWS

 

 शौचालयाचा टँक साफ करताना एकाच घरातील पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू

0 842

परभणी : सोनपेठ तालुक्यातील भाऊचा तांडा येथे मारुती राठोड यांचे शेत आहे. या ठिकाणी सेप्टिक टॅंकची सफाई करण्यासाठी काही सफाई कामगारांना बोलावण्यात आले होते.

 

 

सर्व कामगार शेतातील आखाड्यावर आले. टॅंकची सफाई सुरू असताना एक कामगार रात्री आठ ते नऊच्या दरम्यान टॅंकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी इतर चारजण आत उतरले. एका मागोमाग एक पाचजण टॅंकमध्ये गेले, मात्र बराच वेळ झाला तरी कोणीच बाहेर येत नसल्याने त्या ठिकाणी असलेल्या एकाने आरडाओरडा केला.

काही वेळाने आसपासचे लोक जमा झाले व पोलीसही हजर झाले. यावेळी पोलिसांनी टँकवरील सिमेंटचे छत जेसीबीने फोडून टाकले. त्यानंतर आत गुदमरून मेलेल्या सर्व सफाई कामगारांना बाहेर काढण्यात आले.

 

यात एकाच कुटुंबातील पाचजणांचा समावेश आहे. मृतांमध्ये शेख सादिक (वय ४५), शेख शाहरुख (वय २०), शेख जुनेद (वय २९) शेख नवीद (वय २५) शेख फिरोज (वय १९) या चौघांचा समावेश असून शेख साबीर (वय १८) हा कामगार अत्यवस्थ आहे. त्याला परळी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या यासंदर्भातील योजनेतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेतील जखमी झालेल्या कामगारावर आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार शासनाच्या खर्चातून करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.