रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात. तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये चुकी दोन्ही बाजूने असल्याचे समोर आले आहे. ज्यामध्य वाहन चालकाना वेग आणि समोरील वाहन चालकाचा हलगर्जीपणा कारणी भूत ठरला आहे. एक तरुण सायकलवरून जात होता. तेव्हा तो एका कारच्या दरवाजाला धडकला.

त्यानंतर एका चालत्या ट्रकखाली गेला. संपूर्ण ट्रक त्या तरुणाच्या अंगावरून गेला. पण थोड्या वेळाने तुम्ही पुढे पाहाल तर ट्रकखालून कुणीतरी बाहेर येताना दिसते. ट्रकच्या पुढच्या भागाकडून. तुम्ही नीट पाहिलं तर हा तोच तरुण आहे.
जो अपघातानंतर या ट्रकखाली गेला. तरुणाला काहीच झालं नाही आहे. तो सुखरूप आहे. सुदैवाने तो ट्रकच्या मधोमध होतो. चाकं त्याच्यावरून गेली नाही. त्यामुळेच त्याचा जीव बचावला.
Omg 🫣 pic.twitter.com/dA6bCgmWUn
— CCTV IDIOTS (@cctvidiots) May 9, 2023