Latest Marathi News

BREAKING NEWS

ऑर्डर केलेलं जेवण आणायला उशीर झाला म्हणून तरुणीकडून डिलीव्हरी बॉयला मारहाण! व्हिडीओ पहा…

0 886

आजकाल लोक फूड डिलीव्हरी अॅाप्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. आवडत्या हॉटेलमधून आवडता पदार्थ ऑर्डर घरी पोहचत असल्याने बहुतांश लोक हे अॅाप्स नियमितपणे वापरत आहेत. यामध्ये तरुणांचा मोठा समावेश आहे.

 

जेवण घरापर्यंत पोहचवणाऱ्या लोकांना ‘फूड डिलीव्हरी बॉय’ असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांमध्ये काही ग्राहक या लोकांशी गैरवर्तवणूक, दुर्व्यवहार करत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

Manganga

या व्हिडीओमध्ये एक तरुणी आणि तिची आई एका फूड डिलीव्हरी बॉयशी हुज्जत घालताना पाहायला मिळतात. फूड डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तीला ऑर्डर आणण्यासाठी उशीर झाल्याने माय-लेकी त्या बॉयवर चिडलेल्या असतात. पुढे अचानक ती तरुणी बॉयला जोरात मारु लागते. तिची आईदेखील त्या सामील होते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यूजर्स हा व्हिडीओ शेअर करत असल्याचे दिसते. अनेकांनी कमेंट करत या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजणांनी जेवण ऑर्डर करणाऱ्या आणि त्या डिलीव्हरी बॉयला मारणाऱ्या मुलीवर टीका केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!