जंगलातील सर्वात बुद्धिमान प्राणी अशी ओळख असलेल्या हत्तीचे अनेक व्हिडीओ दरदिवशी समोर येत असतात. हत्तीच्या हुशारीचे अनेक नमुने पाहून थक्क व्हायला होते. या सर्वात बलाढ्य व सर्वात हुशार प्राण्याला काही शक्य नसेल तर ते म्हणजे वेगवान हालचाली करणे, अर्थात हत्तीचे वजन पाहता ही गोष्टी साहजिक आहे.
पण थांबा आता व्हायरल होणारा व्हिडीओ या सर्व गैरसमजूतींना छेद देणारा आहे. चाणाक्ष हत्तीने चक्क एका फणसाच्या झाडावर चढून फणस तोडल्याची एक क्लिप भरपूर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एका गावातील फणसाच्या झाडावर लागलेले फळ तोडण्यासाठी हत्ती झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या पुढच्या दोन पायांनी त्याने झाडाच्या खोडाला विळखा घातला आहे तर खालच्या पायांनी हळू हळू वर जाण्याचा तो प्रयत्न करत आहे. फणसाच्या झाडावर फळ फार उंचावर नसते त्यामुळे सोंडेने हत्ती सहज फळ तोडू शकत आहे. तरीही साधारण अर्ध्या झाडावर हत्ती चढला आहे.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये अनेक गावकऱ्यांचे आवाज येत आहेत. ही मंडळी गजराजांना झाडावर चढण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. जे पाहून नेटकरी खूप कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
Using hind legs to jack up for the jackfruit😊😊
Hind legs are super strong in elephants. Imagine supporting more than 4000kgs here. pic.twitter.com/YpxdI1aJ7S— Susanta Nanda (@susantananda3) May 8, 2023