Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगलीत नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या दोघांना अटक

0 710

माणदेश एक्सप्रेस न्यूज : सांगली : नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून नायट्रोव्हेट, नायट्रोसन या गोळ्या तसेच रोकड असा 3 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील कर्नाळ रस्त्यावरील शिवमुद्रा चाळ येथे एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केल्याची एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

अनिकेत विजय कुकडे (वय 21, रा. बुरुड गल्ली, सांगली), उमर सलीम महात (रा. गवळी गल्ली,सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्ह्यात अमली पदार्थ, नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री होत असल्याने  गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे असे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक शिंदे यांनी एक पथक तयार केले होते.

Manganga

या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिकेत कुकडे हा नशेच्या गोळ्या विक्री करण्यासाठी कर्नाळ रस्त्यावरील शिवमुद्रा चौक या ठिकाणी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला. त्यावेळी याच्याकडून या गोळ्या खरेदी करण्यासाठी उमर महात तेथे आला. या गोळ्यांची जादा दराने विक्री करताना कुकडे याला तर त्या खरेदी करताना उमर महात यांना पकडण्यात आले. दोघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप शिंदे, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, मच्छिन्द्र बर्डे, संदीप पाटील, गोतम कांबळे, विक्रम खोत, संतोष गळवे,बिरोबा नरळे, सागर लवटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!