Latest Marathi News

BREAKING NEWS

लग्न समारंभात स्टेजवर इंजिनीअरचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू! हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग; व्हिडीओ पहा…

0 710

अनेकांना कधी जिममध्ये व्यायाम करताना तर कधी डान्स करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना आपण सोशल मीडियावर पाहत असतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्न समारंभात नाचताना एका इंजिनीअरचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला आहे.

मृत इंजिनीअरचे नाव दिलीप राऊतकर असे आहे. ते आपल्या भाचीच्या लग्नात डान्स करत असताना मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिलीप राऊतकर हे लग्न समारंभात स्टेजवर वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह नाचताना दिसत आहेत. नाचत असताना दिलीप स्टेजवर बसतात आणि काही क्षणात खाली कासळतात.

Manganga

दरम्यान स्टेजवर काय झाले हे लोकांना समजण्यापूर्वीच दिलीप यांचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास दिलीप आणि त्याचे नातेवाईक स्टेजवर वधू-वरासोबत नाचत असताना दिलीप यांच्या छातीत अचानक दुखू लागले यावेळी ते स्टेजवर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!