सोशल मीडियावर सध्या शाळेतील परीक्षांच्या उत्तर पत्रिका व्हायरल होत आहेत. यात विद्यार्थ्यांची भन्नाट उत्तर दिलेली असतात. मुल शाळेत परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहतात तर काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही तर काही उत्तरे लिहून निघून जातात.
मात्र, असे काही विद्यार्थी आहेत जे वेगळच काहीतर लिहीतात. एका विद्यार्थ्याला परिक्षेत गायीवर निबंध लिहायला सांगितला. तर या पठ्ठ्याने पाहा काय करून ठेवले. त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच खळखळून हसायला लावेल.

शालेय जीवनात विद्यार्थी जेवढ्या उचापाती करतात त्या प्रत्येकाच्या कायमच स्मरणात असतातच. पण काही विद्यार्थी हे असेही असतात त्यांच्या एका कृतीने खूपच प्रसिद्ध होऊन जातात. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता.
एक विद्यार्थी ब्लॅकबोर्डवर काहीतरी लिहायला उभे आहे. यादरम्यान, मागून शिक्षकाचा आवाज येतो आणि ते आदर्श नावाच्या मुलाला म्हणतात गायीवर निबंध लिही. प्रश्न ऐकून मूल फळ्यावर लिहू लागतो. प्रथम तो गाय लिहितो आणि नंतर त्यावर निबंध लिहितो. हे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा निबंध लिहून या विद्यार्थ्याने सर्वांना चकित केले आहे.