माणदेश एक्सप्रेस न्युज : नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठाचा निकाला सुरु असून यामध्ये शिंदे गटाला मोठा झटका बसला असून शिंदे प्रतोत ची नेमणूक बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला आहे.
शिवसेनेतील बंडामुळे निर्माण झालेला घटनात्मक पेच सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता आणि यामुळे न्यायालयात उभय बाजूकडून जोरदार वाद-प्रतिवाद झाला होता. खटल्यातील अनेक पैलू घटनात्मक मुद्दयाशी संबंधित असल्याने या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले होते. शिंदे गटाकडून जेष्ठ वकील हरिश साळवे, निरज कौल आदिंनी युक्तिवाद केला होता. तर, ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी या दिग्गजांनी बाजू मांडली होती. दुसरीकडे राज्यपालांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली होती.

आज घटना पीठाने निकाल सुरु केला असून यामध्ये शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी केलेली नेमणूक ही बेकायदेशीर असल्याचा निकाल दिला असून पहिले तीन निरीक्षणे खंडपीठाणे ठाकरे गटाच्या बाजूने नोंदविली आहेत.