सुट्टीच्या काळात अनेकांना फिरायला जायला आवडते. लोक इन्जॉय करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत बाहेर जातात. पर्यटनस्थळी हॉटेल अथवा एखाद्या भक्तनिवासात मुक्काम करतात. पण आता एखादा बंगला किंवा रूमही भाड्याने घेण्याचा ट्रेंड आहे. हॉटेलच्या तुलनेने हे स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक पर्यटक याचा वापर करतात.
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियात १४ मैत्रिणीसोबत फिरायला गेलेल्या २६ वर्षीय सोबत जे घडले त्याने तिच्यासह तिचे फ्रेंडही घाबरले आहेत. एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त आलेल्या लेडीज ग्रुपमधील मुलीला घरात काहीतरी अजब घडत असल्याचा संशय आला. अशावेळी मुलींनी फ्लॅश लाईट ऑन करून घरातील कानाकोपरा शोधण्यास सुरूवात केली.

शॉवरहेड, पिक्चर फ्रेमपासून दरवाजाच्या लॉकपर्यंत सगळीकडे मुलींनी शोध घेतला. तेव्हा बाथरूममध्ये जे काही पाहिले त्याने मुलींच्या पायाखालची जमीन सरकली. या प्रॉपर्टीच्या बाथरूममध्ये प्लग सॉकेटखाली एक छोटासा कॅमेरा होता. या कॅमेऱ्यातून अंघोळ करणाऱ्या मुलींचे नग्न व्हिडिओ कुणीतरी बनवत असल्याचे पाहून मुलींना मोठा धक्का बसला.
खोलीत छुपे कॅमेरे कसे असतात याबाबत व्हिडिओत मुलींनी पाहिले होते. त्यामुळे ज्या घरात थांबलोय त्याची पाहणी करायला हवी असं मुलींनी ठरवले. बाथरुममध्ये मुलींना जो छुपा कॅमेरा मिळाला तो टॉयलेट सीट आणि शॉवर घेतानाचे दृश्य कैद करणारे होते. हा कॅमेरा पाहून मज्जा करण्यासाठी आलेल्या मुलींना शॉक बसला. त्यानंतर तातडीने पोलिसांना फोन करून मुलींनी हा प्रकार सांगितला.