सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. प्रसिद्धीसाठी लोक मजेशीर गोष्टींपासून भयानक स्टंटपर्यंत सर्वच करताना दिसून येतात. अनेकदा त्यांचे हे भयानक स्टंट त्यांच्याच अंगलट येतात.
याचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आणखी एख व्हिडीओ समोर आलाय जो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे.

या व्हिडिओमधील व्यक्तीने असं धक्कादायक काम केले. ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. धाडसीपणा आणि मूर्खपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्राणीसंग्रहालयातील मगरीच्या घेराबाहेर उभ्या असलेल्या गर्दीसमोर एक माणूस आपलं धैर्य दाखवायला जातो. मात्र पुढे जे घडतं ते अतिशय धक्कादायक आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता.
एक व्यक्ती मगरीच्या पाठीवर बसला आहे, आणि मगरीसोबत स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तो मगरीच्या तोंडात हात घालण्याचा प्रयत्न करतो. तो मगरीच्या तोंडात घालतो आणि क्षणात मगर त्याच्या हातावर हल्ला करणयासाठी तोंड बंद करते, मात्र या व्यक्तीने लगेच हात काढल्यामुळे तो थोडक्यात बचावतो.
— 1 second before disaster (@1secB4disaster) May 9, 2023