Latest Marathi News

BREAKING NEWS

कोळा येथे दोन विचित्र अपघातात तीन ठार

0 3,418

माणदेश एक्सप्रेस न्युज : कोळा/प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील कोळा येथे बाणुरगड-आटपाडी रस्त्यावर जेसीबी आणि दोन मोटरसायकल यांच्यात समोरा-समोर झालेल्या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, बाणुरगड-आटपाडी रस्त्यावर काल दि. १० रोजी रात्री ८.३० च्या सुमारास जेसीबी व मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यामध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये कराडवाडी (कोळा) येथील गोविंद रामा आलदर हा जागेवरच ठार झाला. गोविंद आलदर यांची मोटरसायकल ही जेसीबी बकेटच्या खाली अडकली होती.

Manganga

अपघात झाला त्या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. सदरचा अपघात पाहून कोळा येथील तानाजी सूर्यवंशी हे पुढे जात असताना पात्रेवाडीहून कोळ्याकडे निघालेल्या भरधाव मोटरसायकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये पात्रेवाडी येथील लग्न कार्यासाठी मुंबईहून आलेल्या एकजण जाग्यावरच ठार झाला.

 

या अपघातामध्ये जखमी झालेल्या तानाजी सूर्यवंशी यांना पुढील उपचारासाठी सांगली येथे घेवून जाताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. या अपघातामध्ये दोन्ही दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघाताची नोंद सांगोला पोलीस ठाणे येथे झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!