अपात्रतेची टांगती तलवार डोक्यावर असणारे ‘हे’ आहेत सोळा आमदार : यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश
माणदेश एक्सप्रेस न्युज
नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या ( दि.११ ) सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ निकाल देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी करणाऱ्या १६ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत घटनापीठ निकाल सुनावणार आहे. अशात हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर मुख्यमंत्री शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुरूवारी सकाळी ११ वाजता निकाल सुनावला जाण्याची शक्यता आहे.
घटनापीठाचा निकाल साधारणत: उद्या दि. ११ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या आसपास जाहीर होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी आज घटनापीठाशी संबंधित दोन महत्वाचे निकाल जाहीर केले जाणार असल्याचे समलैंगिक संबंधांबाबतच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सांगितले. त्याचवेळी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल येणार हे स्पष्ट झाले.
