Latest Marathi News

BREAKING NEWS

तीन एसटींचा विचित्र अपघात : जीवितहानी नाही, मात्र २० जखमी, चालक गंभीर

0 890

माणदेश एक्सप्रेस न्युज
नागपूर : वर्धा-नागपूर मार्गा वरील तीन एसटींचा विचित्र अपघात झाला असून यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र २० जखमी झाले असून चालक गंभीर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वर्धा-नागपूर महामार्गावर सेलू जवळील जंगलपूर फाट्याजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा टायर पंक्चर झाल्याने बस थांबली. या बसमधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये चढत असताना तिसरी बस पाठीमागून आली. अशाप्रकारे तीन बसेस एकमेकांना भिडल्या आणि हा विचित्र अपघात घडला. सदरची घटना आज बुधवारी घडली.

Manganga

नागपूर-वर्धा मार्गावर जंगलापूर फाट्याजवळ परिवहन महामंडळाची नागपूरवरून वर्धेच्या दिशेने येणारी एसटी क्रमांक एम एच ४० वाय ५५८५ या गाडीचा टायर पंक्चर झाल्याने ती बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती. त्या बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बस क्रमांक एम एच ०६ एस ८०९० या गाडीमध्ये बसविण्यासाठी ती एसटीसुद्धा थांबली. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या क्रमांक एम एच २० बी एल ४१०४ या एसटीने उभ्या असलेल्या बसेसला जोरात धडक दिली. या अपघातात वाहन चालकासह २० प्रवासी जखमी झाले. चालक गंभीर असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!