Latest Marathi News

BREAKING NEWS

नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधांची अवैधरित्या विक्री होणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

0 358

 

माणदेश एक्सप्रेस न्युज .सांगली : नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधांची अवैधरित्या विक्री होणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय अशा औषधांची विक्री होणार नाही, याची खबरदारी औषध दुकानदारांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या.

 

Manganga

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासन विभाग आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. बैठकीस अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त सपना घुणकीकर यांच्यासह केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते.

 

ज्या रुग्णांना डॉक्टरांनी अशी औषधे लिहून दिली आहेत, त्यानाच ती देण्यात यावीत. दिलेल्या औषधांचे रजिस्टर ठेवावे. औषधांच्या जितक्या गोळ्या डॉक्टरांनी लिहिल्या आहेत तेवढ्याच गोळ्या दिल्या जाव्यात.  18 वर्षांखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत. आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने ही हिताची बाब आहे त्यामुळे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने याबाबत सर्व औषध दुकानदारांमध्ये जनजागृती करावी, असे जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी सांगितले.

 

नशेकरिता वापरण्यात येणारी औषधे काही आजारांमध्ये डॉक्टरांकडून रुग्णांना लिहून दिली जातात, अशी औषधे विक्री करताना त्यांचे वेगळे रजिस्टर ठेवावे. ज्या रुग्णांना अशी औषधे दिली आहेत त्याबाबत खातरजमाही औषध विक्रेत्यांनी करणे आवश्यक आहे. तसेच विना परवाना अशा औषधांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास त्याची माहिती पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनास द्यावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी यावेळी दिल्या.

यावेळी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधांची विक्री केली जाणार नाही असा विश्वास प्रशासनास  दिला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!