Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : सुभाष पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर गुन्हा दाखल

0 3,248

सुभाष पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर गुन्हा दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील कौठूळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांचा आटपाडी- दिघंची रोड वरील सावित्रीदेवी इंडस्ट्रीजवळ दिनांक ०६ रोजी झालेल्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी दुचाकी वाहन चालकावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

कौठूळीचे उपसरपंच व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आटपाडीचे शाखा अधिकारी सुभाष पाटील हे आटपाडीहून कौठूळीकडे निघाले होते. त्यांची दुचाकी सावित्रीदेवी इंडस्ट्रीजवळ ते त्यांच्या वस्तीकडे निघाले असता दिघंचीहून येणाऱ्या दुचाकी गाडीने त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, सुभाष पाटील यांची दुचाकी शंभर फुट अंतरावर जावून पडली. यामध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात जखम झाली. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते. परंतु त्यांचा मृत्यू झाला होता.

Manganga

या अपघात प्रकरणी मयत सुभाष पाटील यांचा मुलगा ऋषिकेश सुभाष पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बाळू विलास निकम रा. इटकी, ता. सांगोला यांच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!