Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली : ‘नीट’ परीक्षेवेळी विद्यार्थिनींबरोबर गैरवर्तन : राज्य महिला आयोगाकडून दखल

0 978

सांगली : रविवारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) देशभरात घेण्यात आली. या परीक्षेवेळी सांगली येथील परीक्षा केंद्रांवर केलेल्या तपासणीवेळी मुलींशी गैरवर्तन झाल्याच्या प्रकाराची दखल घेऊन राज्य महिला आयोगाने एनटीए, तसेच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची, विशेषतः मुलींच्या तपासणीवेळी गैरवर्तन झाल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमांतून, समाजमाध्यमातून समोर आले आहे. या प्रकाराची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. तसेच मुलींबरोबर अशा प्रकारच्या वागणुकीचा निषेध करण्यात आला. या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र एनटीएला देण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, की एनटीएने देशभरात घेतलेल्या परीक्षेवेळी विद्यार्थिनींची अत्यंत चुकीच्या पद्धतीने तपासणी करण्यात आली.

Manganga

कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विद्यार्थिनींना कपडे उलटे करून घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणे ही अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय बाब आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी. राज्यभरात असे आणखी काही प्रकार घडले आहेत का, याचीही चौकशी करून दोन दिवसांत त्याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!