डोंबिवली : सहा वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणा-या २२ वर्षीय नराधमाला रामनगर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. आरोपी हा पिडीतेच्या समोरच राहणारा असून मजूरीचे काम करतो. तो मुळचा उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
पुर्वेकडील परिसरात पिडीत मुलगी कुटुंबासह राहते. शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पिडीत मुलीची आई घराबाहेर गेली होती. त्यावेळी पिडीत मुलगी आणी तीचा भाऊ अंगणात खेळत होते. तेव्हा समोर राहणा-या २२ वर्षीय आरोपीची नजर मुलीवर पडली. तीची आई बाहेरी गेल्याची संधी साधत त्याने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले.

तीच्या भावाला नराधमाने शिवीगाळी करीत हाकलून लावल्याचे आणि नंतर तीला घरात नेऊन तीच्याशी अश्लील चाळे केल्याकडे तीने लक्ष वेधले. दरम्यान पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.