Latest Marathi News

BREAKING NEWS

वैजापूर : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात घडली अनपेक्षित घटना…

0 1,156

छत्रपती संभाजी नगरमधल्या वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम सुरु झाला आणि अचानक एक अनपेक्षित घटना घडली. गौतमी पाटील ही कायम चर्चेत असते. आता या घटनेमुळे गौतमी पाटील पुन्हा चर्चेत आली आहे.

छत्रपती संभाजी नगरमधल्या वैजापूर या ठिकाणी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील येणार म्हटल्यावर कार्यक्रमाला गर्दी होतेच. तशीच त्या या कार्यक्रमालाही झाली. गौतमीचा डान्स पाहण्यासाठी काही चाहते एका पत्र्याच्या दुकानाच्या शेडवर बसले होते. डान्स सुरु झाला. राती अर्ध्या राती हे गाणं सुरु होते. तेवढ्यात पत्र्याची शेड कोसळली. या घटनेत काही लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र नेमके किती लोक जखमी झाले ते समजू शकलेलं नाही.

Manganga

सबसे कातील गौतमी पाटील या नावाने गौतमी सोशल मीडियावर फेमस आहे. एवढंच काय तर तिच्या डान्सचा कार्यक्रम असला की तिथे गर्दी होतेच. मात्र अशा काही घटना घडतात ज्यामुळे गौतमी पाटीलची चर्चा होते. आता वैजापूरमधल्या महालगाव या ठिकाणी जी घटना घडली त्यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महालगाव येथे गौतमी पाटील हिचा बस स्थानकाजवळ कार्यक्रम सुरू होता.

 

गौतमी पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली होती. जागा मिळेल तिथे लोक बसले होते. काही लोक पत्र्याच्या शेडवरही बसले होते. मात्र या लोकांच्या वजनाचा भार पत्र्याच्या शेडला जास्त झाला आणि शेड कोसळली. त्यामुळे भर कार्यक्रमात गौतमी पाटील डान्स करत असताना हा अपघात झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!