सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, जे पाहून आपणाला हसू आवरणे कठीण होते. तर काही व्हिडीओ धक्कादायक असतात, जे पाहिल्यानंतर अंगावर शहारे येतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका विमानाला भीषण आग लागल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विमानात अनेक प्रवासी होते, जे विमानाला आग लागताच बाहेर पडण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, धावपट्टीवर एक विमान उभे असल्याचे दिसत आहे. तर विमानाच्या मागील भागाला भीषण आग लागल्याचेही व्हिडीओत दिसत आहे. विमानाला आग लागल्याचे दृश्य खूप भयंकर आहे. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, विमानातील काही तांत्रिक बिघाडामुळे त्याचे इमर्जन्सी लॅण्डिंग केल्यानंतर आग लागल्याचे दिसत आहे. शिवाय प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी खूप गडबडीत विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
व्हिडीओमध्ये, विमानाला आग लागताच प्रवासी इमर्जन्सी गेटमधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून तो आतापर्यंत सुमारे १ लाख ४९ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
Time to go! 🔥 pic.twitter.com/PSEgeYfw9A
— Vicious Videos (@ViciousVideos) May 7, 2023