संगमनेर : कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ६९ गोवंश जनावरांना शहर पोलिसांनी जीवदान दिले. सुकेवाडी-समनापूर रस्त्यावर एका पत्र्यांच्या शेडमध्ये ही जनावरे अत्यंत निदर्यतेने बांधून ठेवली होती. या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीक रज्जाक शेख (रा. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस नाईक नीलेश धादवड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. सुकेवाडी-समनापूर रस्त्याला एका पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या संख्येने अत्यंत निदर्यतेने गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे हे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव, पोलिस नाईक विजय पवार, धादवड, सचिन उगले, राम मुकरे, शशिकांत दाभाडे, लूमा भांगरे, साईनाथ पवार, अजय आठरे यांच्यासह तेथे पोहोचले.
पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले असता त्यांना गोवंश जनावरे निर्दयतेने बांधून ठेवली असल्याचे निदर्शनास आले. एक-दोन दिवसांपूर्वी जन्मलेल्या वासरांच्या तोंडाला पट्ट्या बांधल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉस्टेबल अमित महाजन अधिक तपास करीत आहेत.