Latest Marathi News

BREAKING NEWS

मुहुर्त ठरला! बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच विवाहबंधनात अडकणार….

0 367

बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमवत आहे. त्याच्या चित्रपटक्षेत्रातील पदार्पणामुळे तो चर्चेत आहेच. पण आता खासगी आयुष्यामुळेही तो चर्चेत आला आहे.

काही दिवसांपूर्वीच करणने प्रसिद्ध आणि दिवंगत फिल्ममेकर बिमल रॉय यांची पणती द्रिशाशी साखरपुडा केला. आता करण आणि द्रिशा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाची संभाव्य तारीखही जाहीर झाली आहे.

Manganga

कुटुंबातील एका जवळच्या सदस्याने ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार, करण आणि द्रिशा १६ जून ते १८ जूनदरम्यान मुंबईत लग्न करणार आहेत. दोघेही जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट करत होते. द्रिशा आणि तिच्या कुटुंबाला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला आवडत नाही.

करणने ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. लवकरच तो अनिल शर्माच्या ‘अपने २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याचे आजोबा धर्मेंद्र, काका बॉबी देओल आणि वडील सनी देओलही दिसणार आहेत. देओलांच्या या तीन पिढ्यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!