‘होणार सून मी या घरची’ या घरची या मालिकेतील अभिनेत्रीने 12 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत दिला आठवणींना उजाळा; पहा…
‘होणार सून मी या घरची’ आणि ‘अग्गं बाई सासूबाई’ या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अत्यंत थोड्या कालावधीतच तेजश्रीला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.
तेजश्रीने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘बबलू बॅचलर’ या हिंदी चित्रपटामध्ये देखील तेजश्रीने काम केले. तेजश्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने मुंडवळ्या बांधून नवरीच्या वेशातील फोटो शेयर केला आहे.

तेजश्री गेली 15 वर्षांहून अधिक काळ मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. आजवर तिने अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केले आहे. तेजश्री लवकरच तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार आहे. मात्र त्याआधी तिनं एक पोस्ट शेअर करत सर्वांना मोठा धक्काच दिला आहे.
या पोस्ट मधील तिचा फोटो पाहून वाटेल की तिचं लग्न झालं की काय पण तसं नाहीय. हा फोटो 12 वर्षांपूर्वीचा आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या सोबतचा हा फोटो असून तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.