एकीकडे लोक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. तर दुसरीकडे नोकरीवर असणारे लोक नोकरी सोडण्याचा निर्णय घेत आहेत. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. यात अनेक कर्मचारी त्यांच्या नोकरीत समाधानी नाहीत. वर्क प्रेशरमुळे कर्मचारी नोकरीला कंटाळलेत. बहुतांश कर्मचारी बिझी शेड्युलमुळे आपल्या नोकरीतील समाधान, आनंद, शांतता राखण्यात कमी पडत आहेत.
अशा परिस्थितीत काही लोकांना नोकरी सोडणे हाच एकमेव चांगला पर्याय वाटत आहे. अलीकडे एका व्हायरल झालेल्या रेजिग्नेशन लेटरमध्ये एका कर्मचाऱ्याने मोजक्या शब्दात आपल्या नोकरी प्रतीच्या वेदना व्यक्त केली आहे.

कर्मचाऱ्याचे हे रेजिग्नेशन लेटर आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत आहे. हे लेटर आता उद्योगपती हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहे. या रेजिग्नेशन लेटरमध्ये कर्मचाऱ्याने लिहिले आहे की, ‘डिअर हर्ष, मी राजीनामा देत आहे. मजा नाही येत तुझा राजेश… अनेक कर्मचारी कार्यालयीन भाषेत मेलद्वारे किंवा लेखी स्वरुपात आपले रेजिग्नेशन लेटर कंपनीकडे सुपूर्द करतात.
पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा राजीनामा अगदी मोजक्या आणि सोप्या शब्दात लिहिलेला आहे. ज्यात कर्मचाऱ्याने आडेवेडे न घेता राजीनामा देण्यामागचे खरे कारण सांगितले आहे. हे रेजिग्नेशन लेटर शेअर करत हर्ष गोएंका यांनी लिहिले की, ‘हे लेटर लहान आहे पण खूप खोल विचार करायला लावणारे आहे. ही एक गंभीर समस्या आहे. जी आपण सर्वांनी सोडवली पाहिजे. या रेजिग्नेशन लेटरचा स्क्रीनशॉट हर्ष गोएंका यांनी ट्विटरवर तसेच लिंक्डइनवर शेअर केला आहे.