Latest Marathi News

BREAKING NEWS

रस्त्यावरील बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून सोन्याचे दागिने आणि दहा लाखांची रोकड लंपास

0 327

पुणे :रस्त्यावरील एका बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यातून सुरक्षारक्षकाने साथीदाराच्या मदतीने दीड किलो सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी रखवालदार झंकार बहाद्दुर सौद (रा. नेपाळ) याच्यासह दोन साथीदारांच्या विरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रीतम राजेंद्र मंडलेचा (रा. राजव्हिला, मंगलवाडी, सेनापती बापट रस्ता) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Manganga

मंडलेचा बांधकाम व्यावसायिक आहे. मंडलेचा यांच्या बंगल्याची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचे काम एका सिक्युरिटी एजन्सीला देण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून झंकार सौद मंडलेचा यांच्या बंगल्यात सुरक्षारक्षक म्हणून काम पाहत होता. मंडलेचा कुटुंबीय बाहेर जेवण करण्यासाठी गेले होते.

बंगल्याच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाचे कुलूप तोडून सौद आणि दोन साथीदारांनी बंगल्यात प्रवेश केला. शयनगृहातील कपाट उचकटून साडेदहा लाखांची रोकड, पाच अंगठ्या, सोन्याचे कडे, चार सोनसाखळ्या, दोन ब्रेसलेट, चार बांगड्या, सोन्याची बिस्किटे, कुंदनहार, हिरेजडीत दागिने असा ७८ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लांबवून सौद आणि साथीदार पसार झाले. मंडलेचा कुटुंबीय घरी परल्यानंतर शयनगृहातील कपाट उचकटल्याचे आढळून आले. कपाटातून ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर मंडलेचा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!