सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपणाला आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
व्हिडीओमधील व्यक्ती घरी आल्यावर डोक्यात घातलेले हेल्मेट काढत असताना त्याची पत्नी समोरून धावत येऊन आपल्या पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती ऑफिसमधून घरी येताच त्याची बायको त्याला जोरजोरात मारहाण करत असल्याचं दिसत आहे. महिलेने आपल्या नवऱ्याला केलेल्या मारहाणीची संपूर्ण घटना घरात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Wife beats husband immediately after he gets home pic.twitter.com/I32rzrKoQa
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 6, 2023