Latest Marathi News

BREAKING NEWS

हॉटेलच्या रुममध्ये प्रियकर आणि प्रेयसीची विष पिऊन आत्महत्या ….

0 615

मध्य प्रदेशातील इंदूरमधील एका हॉटेलमध्ये प्रियकर आणि प्रेयसीने विष घेतल्य़ाची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये प्रियकर आणि प्रेयसी दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इंदूरच्या विजय नगर भागातील आहे. येथे एक कपल हॉटेलमध्ये पोहोचले होते, तेथे दोघांनी खोलीत विष प्राशन केले. घटनेनंतर दोघेही हॉटेलच्या खोलीत होते.

Manganga

नातेवाईकांनी फोन केला असता, मुलगी फोनवर म्हणाली, “पप्पा, आम्हाला वाचवा.” यानंतर कुटुंबीयांनी संपूर्ण माहिती घेत तात्काळ घटनास्थळ गाठले. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही इंदूरचे रहिवासी आहेत. एक दिवस आधी तरुणाने हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूमचा दरवाजा ठोठावला असता आतून कोणताही आवाज आला नाही. त्यानंतर ही बाब संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना कळवले.
पोलीस हॉटेलवर पोहोचल्यावर त्यांनी दरवाजा उघडून तपासणी केली. यावेळी दोघांनी विष प्राशन केल्याचे निष्पन्न झाले. दोघे 2 वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. दोघांच्या लग्नासाठी कुटुंबीय तयार झाले होते. मात्र त्यानंतरही दोघांनी विष का प्राशन केले, हा तपासाचा विषय आहे.

 

काही दिवसांपूर्वी दोघांच्या संमतीने कुटुंबीय लग्नासाठी तयार झाले होते, मात्र दोघेही शनिवारी कुटुंबीयांना भेटायला गेले आणि हॉटेलमध्ये रूम बुक करून तिथेच थांबले.

या प्रकरणाबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगा आणि मुलगी दोघांनीही विष प्राशन केले आहे. आम्ही प्रकरणाचा तपास करत आहोत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!