वाघ हा जंगलाचा राजा आहे. हा सुंदर प्राणी भारतातील विविध जंगलांमध्ये, अभयारण्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे वाघांच्या संवर्धनाबाबत आपल्या देशातील लोक अधिक जागरुक असतात. जंगलांचे प्रमाण दिवसेनदिवस कमी होत असल्याने वनप्राण्यांची संख्या कमी होत आहे. हरीण, सांबर असे प्राणी वाघाची शिकार असतात.
मानवी वस्त्यांमध्ये फिरताना माणूस समोर आल्यावर वाघ स्वत:चा बचाव करण्याच्या हेतूने हल्ला करतो. तर काही वेळेस वाघाची खोड काढल्यामुळे वाघ माणसांना इजा करतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पिंजऱ्यात हात घालून वाघाला एका प्रकारे त्रास देणाऱ्या तरुणावर वाघाने हल्ला केल्याचे पाहायला मिळते. हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल हे नक्की.

या व्हिडीओच्या सुरुवातीला एक तरुण वाघाच्या पिंजऱ्याबाहेरुन वाघाला स्पर्श करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसते. जवळ येणाऱ्या त्या तरुणाकडे दुर्लक्ष करत वाघ काहीसा मागे जातो. पण वाघाला स्पर्श करण्याच्या नादात तरुण आपला हात पिंजऱ्याच्या आत घालतो. आपण ज्याप्रमाणे मांजरींना कुरवाळतो, त्याच प्रमाणे तो तरुण वाघाला कुरवाळण्याचा प्रयत्न करतो.
वाघाच्या मानेला स्पर्श करण्यामध्येही तो यशस्वी झाला. परंतु काही सेकंद वाघ त्या तरुणाला स्वत:ला स्पर्श करु दिला . पण पुढे लगेच तरुणाचा हात भल्यामोठ्या दातांनी पकडला . त्या तरुणाच्या बाजूला असलेली व्यक्ती ही घटना कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत आहे.