Latest Marathi News

BREAKING NEWS

 

घरगुती वादातून पत्नीला पेटवून पतीची आत्महत्या

0 469

मुंबई : धारावी येथे घरगुती वादातून पत्नीवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याचा आणि त्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. उपचारादरम्यान पत्नी पाठोपाठ पतीचाही मृत्यू झाला असून या प्रकरणी धारावी पोलिसांनी पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

 

धारावीमधील नाईक नगर येथील अशोक गल्लीतील खोली क्रमांक ४१५ मध्ये प्रिया धुरिया (२६) व अनिल धुरिया (२६) दाम्पत्य राहत होते. अनिलला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडण होत होते. अनिल दाऊ पिऊन घरी आल्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.

भांडणामुळे त्यांचा दीड वर्षाचा मुलगा रडू लागल्यानंतर शेजारी राहणारी महिला त्याला आपल्या घरी घेऊन गेली. त्यानंतर अनिलने मद्यधुंद अवस्थेत घरातील रॉकेल प्रियाच्या अंगावर ओतले व तिला पेटवले. त्यानंतर त्याने स्ततःच्या अंगावरही पेट्रोल ओतून घेतले व आग लावली.

या घटनेत प्रिया १०० टक्के, तर अनिल ९० टक्के भाजला होता. उपचारादरम्यान गुरुवारी दुपारी प्रियाचा मृत्यू झाला. या प्रकरणी धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.