Latest Marathi News

BREAKING NEWS

सोशल मीडियातून ओळख झालेल्या प्रेयसीची प्रियकराने केली हत्या

0 397

मध्य प्रदेशच्या बैतुल शहरात एका तरुणीची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली असून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, त्यातूनच हा वाद झाला आणि घटना खून करण्यापर्यंत पोहोचली. असे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आलं आहे.

बैतुलच्या मुलताई पोलीस ठाणे परिक्षेत्रातील गांधी वार्ड परिसरात बुधवारी रात्री एका तरुणीची चाकूने गळा चिरुन हत्या करण्यात आली. सिमरन खान असं मुलीचं नाव असून ती २६ वर्षांची आहे. तर, २५ वर्षीय सानिफ मलिक या युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधातील वादातून सानिफनेच तरुणीची हत्या केली आहे.

Manganga

याप्रकरणी, पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी यांनी म्हटले की, मृत तरुणी आरोपी युवकावर दबाव टाकून त्याला त्रास देत होती. एक वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती. या मुलीचे अनेक मुलांसोबत संबंध होते.

आरोपी युवकाला व्हिडिओ आणि फोटो दाखवत मुलीकडून ब्लॅकमेल करण्यात येत होतं. त्या माध्यमातून युवतीने युवकाकडून पैसेही उकळले होते. मात्र, तिची आर्थिक भूक भागत नसल्याने ती सातत्याने पैशांची मागणी करत. त्यादिवशीही मुलगी मुलाच्या दुकानावर पोहोचली होती. दुकानासमोर तिने गोंधळही घातला. याचवेळी दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि युवकाने अंड्याच्या दुकानातील चाकुने वार करत मुलीची हत्या केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!