मुलांसाठी पालक हा मोठा आधार असतात असे म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. तुमची प्रगती पाहून त्यांना आनंद होतो. मुलांच्या आवडी- निवडीमध्ये आनंद मानणारे, मुलांचे मन समजून घेणारे पालक प्रत्येकाला हवे असतात. मुलांना पाठिंबा देण्यासाठी पालक नेहमी तत्पर असतात. असा काहीसा प्रकार या मुलांसोबतही घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसोबत नाचण्यासाठी हे वडील आपल्या मुलांना प्रोत्साहन देत आहे. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आणि सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
हा व्हायरल झालेला व्हिडिओ साधना नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. क्लिपमध्ये साधना प्रणव हेगडे नावाच्या व्यक्तीसोबत नाचताना दिसत आहे. हे दोघे एका पार्कमध्ये रीलचे रेकॉर्डिंग करत होते. अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या माणसाने त्यांना पाहिले.
त्याने त्या दोघांना विचारले की, त्याची मुले त्यांच्यासोबत नाचू शकतात का? साधना आणि प्रणवने लगेच होकार दिला. या व्यक्तीची मुलं आधी थोडा संकोच करत होती. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिले. वडिलांनी पाठिंबा दिल्यानंतर जेव्हा त्याची मुले नाचू लागताता ते पाहून वडिलांना फार आनंद झाला.
साधनाने आपला अनपेक्षित अनुभव सर्वांना सांगितला आहे. आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले होते, ”जेव्हा आम्ही रिलसाठी शुटींग करत होतो तेव्हा हे सुपर बाबा आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला खूप प्रेमळ पद्धतीने विचारले की, त्यांची मुलं आमच्याबरोबर नाचू शकतात का? मला वाटते की ते मंगळुरुच्या सहलीवर आले होते आणि त्या मुलांमुळे खूप सकारात्मक वातावरण झाले होते, विशेषत: त्या लहान मुलांमुळे. त्याने आम्हा सर्वांचे मन जिंकले. आम्ही त्यांच्या सोबत नाचलो आणि त्यांचे पालक देखील खूप आनंदी झाले.
या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वडिलांच्या हावभावाने सोशल मीडिया युजर देखील आनंदी होत आहेत.