आजकालची तरुणाई अनेकदा बाईकवर स्टंट करताना दिसते. बाईकवर स्टंट करणं हा काही ‘बच्चो का खेल’ नाही. स्टंट करताना छोटीशी चूकही जीवघेणी ठरू शकते. आता हे प्रकरण फक्त मुलांपुरतं मर्यादित नाही. तर मुलीही आता बाईकवर स्टंट करु लागल्या आहेत. विश्वास बसत नसेल तर सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात आपल्याला ‘पापा की परी’ धोकादायक स्टंट करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरणी चालत्या बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहेत. या तरुणींनी चालत्या बाईचा हँडलही मोकळा सोडून दिला आहे. दोन तरुणींमधील एक तरुणी बाईकवर उलटी बसली आहे.
एवढचं नाही तर या तरुणी स्टंटबाजी करत एकमेकींना किसही करत आहेत. तसेच त्यानंतर मिठीही मारत आहेत. हा सगळा प्रकार मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. आतापर्यंत तुम्ही बाईक अश्लिल चाळे करणाऱ्या कपल्सना पाहिलं असेल मात्र या तरुणींचे चाळे पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. यावेळी बाईक मोकळी सोडली असल्यानं अपघात होण्याचीही शक्यता आहे. मात्र या तरुणी बिधांस्त बाईकवर स्टंटबाजी करत आहेत.