एका दिवसात 5-10 कोटी रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने बारावीपर्यंतच शिक्षण घेतले आहे. त्याने एक टीम बनवली होती. या टीमचे सदस्य अनेक शहरांमध्ये पसरलेले आहेत. ही टीम पुरुषांपेक्षा अधिक महिलांना लक्ष्य करत असे. चुकीच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन त्यांची फसवणूक करायची. अशा प्रकारे ही टीम दररोज कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करत असे.
पोलीस उपायुक्त (झोन-11) अजय कुमार बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार श्रीनिवास राव डाडी (49) याला बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या पथकाने हैदराबादमधील एका आलिशान हॉटेलमधून ताब्यात घेतलं. त्याने फक्त 12 वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे, पण तंत्रज्ञानात तो माहीर आहे. पोलीस उपायुक्त पुढे म्हणाले की, श्रीनिवाससोबत त्याच्या टींममधील आणखी चार जणांनाही अटक करण्यात आली आहे.

ही टीम स्वत:ला पोलीस असल्याचे दाखवून फसवणूक करत असे. टीम लोकांना फोन कॉल करत असे, बहुतेक महिला. ज्यांना फोन करण्यात आला त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या ऑर्डर केलेल्या पार्सलमध्ये (कुरिअर) ड्रग्ज किंवा शस्त्रे आहेत. महिला किंवा पुरुषाला फोन करायचे, त्यांच्याकडून बँक खात्यांचा तपशील मागायचे. अशा प्रकारे ते सावज बनवून त्यांच्याकडून पैसे उकळत असत. परंतु म्हणतात ना, कानून के हात लंबे होते है I त्याप्रमाणे हे चोर देखील पोलिसांच्या तावडीत सापडले आहेत. पोलीस या गुन्हाचा अधिक तपास करत आहेत.
.