मुंबई : ग्राहकांना कमी किमतीत तेल मिळत असल्याने किचनमध्ये रोज तेलाचे नवनवे पदार्थ बनवले जात आहेत. पुरी, कचोरी, समोसे, पापड, वडे, भजी असे चमचमीत पदार्थ घरीच बनवले जात आहेत. असे असले तरी सध्याचा वाढता उकाडा पाहता तेल जरा जपूनच खाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
तेलाचे दर काही दिवसांपूर्वी बऱ्यापैकी कमी झाले आहे. दर घटल्याने त्याची मागणीही बऱ्यापैकी वाढली आहे. परदेशातून येणाऱ्या तेलबियांची आवक जास्त असल्याने तेल स्वस्त झाले आहे.

यंदा परदेशातून येणाऱ्या तेलबियांचे प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर झाला. तेलाचे दर कमी झाले आहेत. हे दर पावसाळा सुरू होईपर्यंत स्थिर राहतील अशी शक्यता आहे.