आटपाडी/प्रतिनिधी : मा.आम. राजेंद्रआण्णा देशमुख यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे. याच बरोबर मंत्री सुरेश खाडे, माजी आम. विलासाराव जगताप, नीता केळकर, सत्यजित देशमुख, संग्राम देशमुख यांची हि निवड झाली आहे.

तसेच महाराष्ट्र संघटन मंत्री पदी मकरंद देशपांडे व प्रदेश कार्यकारिणी सदस्य पदी पांडुरंग कोरे, अविनाश मोहिते यांची निवड झाली आहे. सदरच्या निवडी भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या आहेत.