‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशीच चर्चा सध्या गावागावात सुरु असते. अश्लील डान्स केल्याप्रकरणी गौतमीवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर तिने माफी मागितली तरी तिचा डान्स हे काय लावणी नाही असंच मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान गौतमीची क्रेझ वाढतच चालली होती तोच तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला.
अश्लील डान्स केल्याने प्रसिद्धीझोतात आलेली गौतमी पाटीलचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ काढण्याचा खोडसाळपणा केला गेला होता. तो व्हिडिओ काढणारा कोण याचा तपास पोलिस घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं असून तो मुलगा अल्पवयीन निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एखाद्या महिलेसोबत हे कृत्य करणं चूकच आहे मग ती कोणतीही महिला असो. व्हिडिओ कोणी काढला याचा शोध सायबर पोलिसांनी सुरु केला. अखेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. तो अल्पवयीन असल्याने त्याच्या आई वडिलांना विमाननगर पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे.
गौतमीचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली होती. त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही करण्यात आली होती. आता आरोपी अल्पवयीन असल्याने या प्रकरणी योग्य त्या नियमांप्रमाणे कारवाई होईल.