Latest Marathi News

BREAKING NEWS

सांगली : विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचविताना काकासह पुतणीचाही बुडून मृत्यू

0 664

सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण अग्रण धुळगाव येथे विहिरीत पडलेल्या पुतणीला वाचविताना काकासह पुतणीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. मनोज भास्कर शेसवरे (वय ४३) आणि सौंदर्या वैभव शेसवरे (१६. दोघेही रा. अग्रण धुळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

घटनेची अधिक माहिती अशी की, मंगळवारी अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या व तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या, पाणी आणण्यासाठी माय-लेकी दोघीही विहिरीत उतरल्या. विहिरीत उतरलेल्या सौंदर्याने कळशीत पाणी भरले व वरती येत असतानाच अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. काही समजण्याच्या आतच ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा केला.

Manganga

तेवढ्यात सौंदर्याचा चुलते मनोज शेसवरे हे घटनास्थळी धावत आले. सौंदर्या विहिरीत पडलेली पाहून त्यांनी तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि तिला पाण्याबाहेर काढले. सौंदर्याला उचलून पाण्याबाहेर घेऊन येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौंदर्याने मनोज यांना पाण्यामध्ये मिठी मारली. यामुळे मनोज यांना हातपाय हलवता आले नाहीत. यामुळे दोघेही विहिरीत पुन्हा पडले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!