रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपरजायंट्सवर १८ धावांनी विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत केवळ ९ बाद १२६ धावा केल्यानंतर आरसीबीने लखनौला १९.५ षटकांत १०८ धावांमध्ये गुंडाळले. मात्र हा सामना विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन उल हकच्या वादामुळे गाजला.
लखनौच्या फलंदाजीवेळी १७ व्या षटकात विराट कोहली आणि लखनौच्या नवीन उल हक यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. सामना संपल्यानंतर यावरुनच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विराट कोहलीच्या अग्रेसिव्ह फिल्डिंगवेळी नवीन उल हक आणि अमित मिश्रासोबत बाचाबाची झाली. यांच्यातील वाद सोडवण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. सामना संपल्यानंतरही यांच्यामध्ये बाचाबाची झाली. हात मिळवताना विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली.
Another angle of the Virat Kohli vs Gautam Gambhir argument and Naveen Ul Haq having some with King Kohli too. #IPL2023 pic.twitter.com/gVLQXdNXsI
— Farid Khan (@_FaridKhan) May 1, 2023