आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डेटा सेगमेंट्समध्ये होणारी प्रगती, आणि त्यामुळे भारतातल्या नोकऱ्यांमध्ये पुढच्या पाच वर्षांत २२ टक्केपेक्षा जास्त वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एका अभ्यासातून ही सकारात्मक माहिती समोर आली आहे.
जागतिक स्तरावर नोकऱ्यांमध्ये २३ टक्के वाढ होणं अपेक्षित आहे. २०२७ पर्यंत जगभरात ६९ मिलियन नव्या नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने वर्तवला आहे. WEF कडून भविष्यातल्या नोकऱ्यांच्या संधींबद्दल एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात ८०३ कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये ११.३ मिलियनहून अधिक कर्मचारी, २७ उद्योग समूह आणि ४५ अर्थव्यवस्थांचा या सर्वेक्षणात समावेश आहे.
भारताच्या संदर्भात ६१ टक्के कंपन्यांना असं वाटतं की पर्यावरण, समाज व प्रशासन याबद्दलच्या मानकांमुळे नोकऱ्यांच्या संधींमध्ये वाढ होईल. तसंच नव्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आणि डिजिटल ग्रोथमुळे जवळपास ५९ टक्के नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होतील, असं अंदाज आहे.