सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीच हा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या महिलेने बर्फात स्कीइंग करत एक अनोखा रोकॉर्ड केला आहे. तुम्ही म्हणाल बर्फात स्कीइंग काय नवीन नाही, मात्र यावेळी फक्त स्कीइंगची नाही तर तिच्या पोशाखाची चर्चा होत आहे.
आजकाल भारतीय स्त्रीया भारतीय परंपरेच्या पेहरावाला वेगळ्या पातळीवर प्रोत्साहन देत असून एक नवीन ओळख देत आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही व्हिडिओंमध्ये साडी घातलेली एक महिला बर्फाळ टेकड्यांवर स्कीइंग करताना दिसत आहे.

या महिलेनं चक्क नऊवारी साडी घातली आहे, जे पाहून यूजर्स आश्चर्यचकित होत आहेत. कारण स्कीइंग करताना खेळाडू वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसतात.ही पहिलीच महिला असावी जी बर्फात फक्त नऊवारी साडी घालत नाही त्याच बरोबर स्कीइंगही करते. सोशल मीडियावर भारतीय संस्कृती जपल्याबद्दल नेटकरी तीचं भरपूर कौतुक करत आहेत.