Latest Marathi News

BREAKING NEWS

‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेमध्ये होणार ‘या’प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री; या मालिकेमधेही केले आहे काम

0 406

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर ‘नवा गडी नवं राज्य’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशेष म्हणजे उत्तम कथानकाच्या जोरावर या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळे अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत राघव आणि आनंदी यांच्या जीवनात अनेक चढउतार येत आहेत. यामध्येच आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

 

‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेतील राघव, आनंदी, रमा, चिंगी, सुलक्षणा ताई आणि अन्य कलाकारांनी अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. या कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय झाली. त्यामुळेच या मालिकेत नेमकं कधी काय घडणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. यामध्येच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. या मालिकेत येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

Manganga

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेतील मालविका म्हणजेच अभिनेत्री आदिती सारंगधर नवा गडी नवं राज्य मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालविकाच्या इन्स्टाग्राम पेजवर याविषयी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. सध्या तरी आदिती या मालिकेत नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे हे स्पष्ट झालेलं नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!